लॉकडाऊनमध्ये महिलांची दुहेरी कसरत, पाठीच्या दुखण्यांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ

भाग्यश्री भुवड
Tuesday, 13 October 2020

काम करताना बसण्याच्या चूकीच्या सवयी, त्याचबरोबर घरकाम, साफसफाई करताना होणारी कसरत आणि कित्येक महिन्यांपासून घरी राहिल्याने व्यायामाचा अभाव या साऱ्या कारणांमुळे पाठ, मान, खांदे यांचे दुखणे वाढले आहे.

मुंबई: कोविड 19 च्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या काही महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन पाळण्यात आला. अजूनही परिस्थिती तितकीच गंभीर असल्याने वर्क फ्रॉम होम सारखा पर्याय अवलंबण्यात आला आहे. यादरम्यान काम करताना बसण्याच्या चूकीच्या सवयी, त्याचबरोबर घरकाम, साफसफाई करताना होणारी कसरत आणि कित्येक महिन्यांपासून घरी राहिल्याने व्यायामाचा अभाव या साऱ्या कारणांमुळे पाठ, मान, खांदे यांचे दुखणे वाढले आहे.

गृहिणी आणि मुंबईची रहिवासी अविका कुमार (नाव बदललेले आहे), कोरोनाव्हायरस लॉकडाऊन दरम्यान घरकामात मदत कमी मिळत नसल्याने तिला पाठदुखीचा त्रास झाला. तिने गॅस सिलेंडर उचलला. तिच्यावर वेदनाशामक औषधांनी उपचार करण्यात आले. रुग्णाला एपिड्युरल रूट स्लीव्ह इंजेक्शन आणि फिजिओथेरपीसह उपचार करण्यात आले. तिचा पाठदुखी नाहीशी झाली. तिने पुन्हा सामान्य जीवन सुरु केले. “तिच्यासारख्या बर्‍याच स्त्रिया लॉकडाऊन दरम्यान पाठीच्या दुखण्याने पीडित आहेत. अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, इंटरव्हेंशनल स्पाइन अँड पेन मॅनेजमेंट स्पेशालिस्ट डॉ. कैलाश कोठारी सांगतात आमच्याकडे दिवसाला 4 ते 5 रुग्ण पाठदुखीच्या समस्या घेऊन उपचाराकरता येतात.

अधिक वाचाः  अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडली! विद्यार्थी शिक्षणापासून वंचित; पालक, शिक्षक संभ्रमात

ज्या स्त्रिया घरातील सर्व कामे करतात जसे घर स्वच्छ करणे, झाडझुड करणे, घरातील साफसफाईची कामे तसेच फरशी पुसणे या साऱ्या गोष्टींमुळे थकवा जाणवू शकतो आणि स्नायूंच. म्हणूनच, डिशेस करताना ओव्हरस्ट्रेचिंग, स्टूपिंग, झुकणे आणि स्लॉचिंगमुळे व्हॅक्यूमिंग किंवा लॉन्ड्रीमुळे पाठीच्या वेदना होण्याने पाठीच्या कशेरुकास प्रतिबंध होतो.

झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे कन्सल्टंट आणि रिप्लेसमेंट सर्जन डॉ. राकेश नायर म्हणाले, “माझ्याकडे बहुतेक 45 ते 85 वर्षे वयोगटातील गुडघ्यावरील रुग्ण मान आणि पाठीच्या दुखण्याविषयी तक्रारी घेऊन येत आहेत. तर काहींना तर त्यांच्या गुडघेदुखीचा त्रास न होता आता पाठदुखीचा त्रास सुरु झाला आहे. सद्यस्थितीत सुमारे 70 टक्के लोकांना पाठदुखीची तक्रार सुरू झाली आहे. कोविडमुळे बाहेर फिरण्यास, व्यायामाच्या अभावामुळे तसेच एकाच जागी बसून राहण्याची वेळ वाढल्याने मान आणि पाठीच्या दुखण्याला आमंत्रण मिळाले आहे.

अधिक वाचाः  खंडित विजेचा विद्यार्थ्यांना धक्का; 10 समूह महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

साधारण एक तास सलग बसल्यानंतर 15 ते 20 मिनिटे आराम करा आणि पडून राहा. अधुन मधून घरातल्या घरात चाला. दर अर्ध्या तासाने उभे राहून हात पायांचा हलका व्यायाम करा. व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी 12 चा समावेश असलेल्या आहाराचे सेवन करा. आहारासह सोपे व्यायाम प्रकार करायला विसरू नका.हे व्यायाम प्रकार स्नायुंना बळकटी आणायचे काम करतात. दररोज 15 ते 20 मिनिटे मेडिटेशन करा. श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करा असे नायर यांनी स्पष्ट केले.

आपल्या पाठीला आधार देणारी खुर्ची वापरावी, मॉनिटर योग्य उंचीवर ठेवावा, आपली बसण्याची पध्दत अचूक असावी. घरातील कामे कुटुंबातील सदस्यांमध्ये समान वाटून घ्यावे. एका दिवसात संपूर्ण घर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नका. पाठीवरचा ताण कमी करण्यासाठी शारीरीक क्रिया करताना कंबरेला वाकवू नका. जर तुमच्या पाठीचा त्रास कमी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या असे डॉ. कोठारी यांनी स्पष्ट केले.

-----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Forty percent increase Women back pain Lockdown double exercise office housework


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forty percent increase Women back pain Lockdown double exercise office housework