खासगी इमारतींवर हेलिपॅडला आवाज फाऊंडेशनचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

मुंबई - खासगी रहिवासी इमारतींवर हेलिपॅडला परवानगी मिळावी यासाठी राज्य सरकार आणि महापालिका पुन्हा प्रयत्न करत आहे; पण मुंबईसारख्या महत्त्वाच्या आणि लोकसंख्येची जादा घनता असलेल्या शहरात अशा खासगी हेलिपॅडला आमचा विरोध कायम राहील, असा पवित्रा आवाज फाऊंडेशनने कायम ठेवला आहे. मुंबई शहरात ध्वनी, वायुप्रदूषण आणि अपघातांच्या घटना घडतात. या परिस्थितीत आमचा याला 2009 पासून विरोध कायम असल्याचे आवाज फाऊंडेशनने सांगितले.

याआधी 2009-10 मध्ये हेलिपॅडचा प्रस्ताव समोर आला होता. त्या वेळी नौदलापासून स्वयंसेवी संस्थांपर्यंत अनेकांनी विरोध केला होता. जास्त लोकसंख्या असलेल्या भागात हेलिपॅड नसावे या मताला पर्यावरण आणि वन मंत्रालय तसेच केंद्रीय मंत्री परिषदेनेही पाठिंबा दिला होता. आता राज्य सरकार आणि महापालिका खासगी हेलिपॅडसाठी प्रयत्न करत आहे. हेलिकॉप्टर लॅण्डिंगसाठी विशिष्ट ठिकाणी हेलिपॅडची गरज नाही.

आपत्कालीन स्थितीत कुठेही ते उतरवता येते. 26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या निमित्ताने "छाबाड हाऊस'जवळ याचा प्रत्यय आला होता. न्यूयॉर्कसारख्या शहरातही खासगी हेलिपॅडला बंदी आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात याचा हट्ट कशाला, असाही सवाल "आवाज'च्या अब्दुल्लाली यांनी केला.

एका हेलिकॉप्टरमुळे सुमारे 120 डेसिबल इतका मोठा आवाज होतो. हेलिकॉप्टर उतरताना व उड्डाण करतानाही मोठ्या प्रमाणावर धूळ उडते. मुंबईतील इमारतींची उंची पाहता रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर याचा त्रास होण्याची शक्‍यता आहे. म्हणूनच खासगी इमारतींवर हेलिपॅड झाल्यास मोठा त्रास होईल, असे अब्दुल्लाली म्हणाल्या.

Web Title: Foundation and private buildings Helipad voice opposition