Electric Bus

Electric Bus

ESakal

Mumbai News: मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ होणार; बेस्टच्या ताफ्यात नव्या इलेक्ट्रिक बस दाखल

Electric Bus: हरित गतिशीलतेकडे वाटचाल करण्याच्या दिशेने इलेक्ट्रो मोबिलिटीच्या मुंबादेवी मोबिलिटी भागीदारीतून मुंबईत १२ मीटर लांबीच्या ४ अत्याधुनिक इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत.
Published on

मुंबई : बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) आणि पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटीच्या मुंबादेवी मोबिलिटी भागीदारीतून मुंबईत १२ मीटर लांबीच्या ४ अत्याधुनिक इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. कुलाबा येथील बेस्ट मुख्यालयात झालेल्या समारंभात या बसचे लोकार्पण महाव्यवस्थापक आशिष शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. हरित गतिशीलतेकडे वाटचाल करण्याच्या दिशेने बेस्ट उपक्रमाचे हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com