दरोड्यापूर्वीच चौघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

मुंबई - दागिन्यांच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चौघांना मंगळवारी खार येथे अटक करण्यात आली. न्यायालयाने चौघांनी गुरुवारपर्यंत (ता. 25) पोलिस कोठडी सुनावली आहे.

मुंबई - दागिन्यांच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चौघांना मंगळवारी खार येथे अटक करण्यात आली. न्यायालयाने चौघांनी गुरुवारपर्यंत (ता. 25) पोलिस कोठडी सुनावली आहे.

त्यांच्याकडून एक पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, चॉपर, मिरची पावडर जप्त करण्यात आली आहे. सोमवारी (ता.22) रात्री खारमधील दागिन्यांच्या दुकानाच्या परिसरात चौघांनी फिरत असताना पोलिसांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांची झडती घेतली.

Web Title: four arrested before robbery