Arnala Sea: नमाज पठणासाठी घरातून निघाले अन् अर्नाळा समुद्रावर पोहोचले; भरतीच्या पाण्यात ४ मुले बेपत्ता
Arnala Sea Youth Drowning Case: अर्नाळा समुद्रात चार मुले बेपत्ता झाल्याची घटना घडली. यावेळी दोघांना वाचवण्यात यश आले आहे. तसेच एकाचा मृतदेह आढळला असून दुसऱ्याचा शोध सुरु असल्याची माहिती आहे.
नालासोपारा : विरारच्या अर्नाळा समुद्रात पोहण्यासाठी आलेली चार मुले गुरुवारी (ता. १६) सकाळी बुडाली. त्यातील दोघांना गस्तीवरील पोलिस, जीवरक्षकांनी वाचवले, तर दोघे भरतीच्या पाण्यात बेपत्ता झाले आहेत.