esakal | मलंगगड परिसरात दारु पिऊन स्टंट करणाऱ्या चौघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

police arrested

मलंगगड परिसरात दारु पिऊन स्टंट करणाऱ्या चौघांना अटक

sakal_logo
By
दीनानाथ परब

कल्याण: मलंगगड परिसरात मद्यधुंद अवस्थेत जीवघेणा स्टंट करणाऱ्या चार मुलांना हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी साम टीव्हीने या संदर्भात वृत्त प्रसारीत केले होते. त्या वृत्ताचा इम्पॅक्ट झाला आहे. (Four boys who done stunt at malanggad area arrested by police)

पोलिसांनी काल संध्याकाळीच मलंगगड परिसरात गस्त घालून मद्यधुंद अवस्थेत जीवघेणा स्टंट केलेल्या चार मुलांना अटक केली असून ते येथील हेदूटने गावात राहणारे आहेत. वैभव भंडारी,प्रविण भंडारी,आकाश भोपी, देवानंद भंडारी अशी त्यांची नावे आहेत.

हेही वाचा: मुंबई: सेक्सवर्धक औषधांच्या नावाखाली परदेशी नागरिकांची फसवणूक

त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. स्टंट वेळी वापरण्यात आलेली गाडी जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती हिल लाईन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांनी दिली