वनविभागाचे चार वनतलाव सततधार पावसाने फुटले

lake
lake

गोरेगाव - येथील वनपरिक्षेत्राधीकारी विभागातंर्गत येत असलेल्या मुरदोली, कालीमाटी, हिराटोला येथे चार वनतलाव एका महिन्यापूर्वी १ कोटी रुपये खर्च करुन मग्रारोहयोतुन तयार करण्यात आले. या चारही वनतलावाची पाळ सततधार पाऊसाने फुटल्याने पाणीसाठा वाहुन गेला त्यामुळे शेतकरी, वन्यप्राण्यांना फटका बसणार असल्याची चर्चा होत आहे.

सन १७-१८ या वर्षात हिराटोला येथे २ वनतलाव, कालीमाटी येथे १ वनतलाव, मुरदोली येथे १ वनतलाव असे चार वनतलाव मग्रारोहयो तुन जुन २०१८ ला पुर्ण करण्यात आले होते प्रत्येकी एका वनतलावाच्या बांधकामावर २४ लाख ९९ हजार रुपये खर्च करण्यात आले  हे वनतलाव जलसंवर्धनाच्या उद्देशाने तयार करण्यात आले असले तरी एका महीन्यातच हे वनतलाव फुटल्याने या बांधकामावर प्रश्नचिन्ह गावक-यांनी निर्माण केला असुन शेतकरी व वन्यप्राण्यांना मोठे नुकसान झाल्याची चर्चा होत आहे

वनतलाव बांधकामा अंतर्गत मातीबांधकाम,पिचींग, वेस्टवेअर ची कामे एकाच वेळेत करण्यात आले व हिराटोला येथील वनतलावाची पाळ व वेस्टवेअरची उंची सारखीच  असल्याने या वनतलावाच्या पाळीला २० फुट खड्डा पडल्याने संपुर्ण पाणीसाठा वाया गेला या बांधकामाची चौकशी करण्यात यावी व पुन्हा या वनतलावाची दुरुस्ती करण्यात यावी असी मागणी कालीमाटी चे सरपंच रहांगडाले व हिराटोला, मुरदोली च्या नागरीकांनी केली 

तालुक्यात सततधार पाऊसामुळे या वनतलावात भरपुर पाणी साठा झाला पाळीचे बांधकाम नुकतेच करण्यात आले आहे त्यामुळे तलावांची पाळ फुटल्या , मात्र लवकरच दुरुस्ती केल्या जातील
एस एम जाधव वनपरिक्षेत्राधीकारी गोरेगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com