कोरोना, पावसाबरोबरच आता मुंबईकरांसमोर मोठं संकट! जायचं तरी कुठे?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

 • कोव्हिडचा प्रादुर्भाव, पावसाळी आजार, पाणी साचणे यासोबत शहरातील धोकादायक इमारतींचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे.
 • मुंबई महापालिकेने 443 इमारती धोकादायक ठरवून रिकाम्या करण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत.

मुंबई : कोव्हिडचा प्रादुर्भाव, पावसाळी आजार, पाणी साचणे यासोबत शहरातील धोकादायक इमारतींचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. मुंबई महापालिकेने 443 इमारती धोकादायक ठरवून रिकाम्या करण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. परंतु, कोरोनाच्या संकटात पर्यायी निवारा कसा शोधावा, या पेचात रहिवासी सापडले आहेत.

ही बातमी वाचली का? जयंत पाटील यांचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत 'मोठं' आणि सूचक विधान, म्हणालेत...

मुंबई महापालिकेने 443 इमारती अतिधोकादायक जाहीर केल्या असून, रहिवाशांना घरे रिकाम्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एन प्रभाग (घाटकोपर) कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 52, एच पश्‍चिम विभाग (वांद्रे, खार पश्‍चिम) कार्यालयाच्या हद्दीत 51 आणि टी विभाग (मुलुंड) कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 49 धोकादायक इमारती आढळल्या आहेत. त्यामध्ये महापालिकेच्या 90 आणि सरकारच्या 34 इमारतींचाही समावेश आहे. 

ही बातमी वाचली का? मुंबईतल्या रुग्णालयांमधून मृतदेह होताहेत गायब! भाजपने केला धक्कादायक दावा

महापालिका भाडेकरू व काही कर्मचारी वसाहतीही धोकादायक झाल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी या सर्व इमारती रिकाम्या करण्यास महापालिकेकडून सुरवात होते. सध्या कोव्हिड महामारीमुळे रहिवाशांना पर्यायी घरे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता पावसाबरोबरच धोकादायक इमारतींचे संकटही मुंबईकरांपुढे उभे आहे. मुंबईत 2015 ते 2019 या काळात 1472 इमारती कोसळल्या. या दुर्घटनांत 106 जणांचा मृत्यू झाला आणि 366 रहिवासी जखमी झाले.

ही बातमी वाचली का? वडा-पाव, मिसळचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईकरांची गर्दी

प्रभाग धोकादायक इमारती 

 • ए (कुलाबा ) 4 
 • बी (काळबादेवी) 2 
 • सी (गिरगाव) 2 
 • डी (ग्रॅंट रोड, मलबार हिल) 9 
 • ई (भायखळा, माझगाव) 11 
 • एफ दक्षिण (लालबाग, परळ) 5 
 • जी दक्षिण (वरळी, प्रभादेवी) 9 
 • एफ उत्तर (दादर, माटुंगा पूर्व, शीव) 28 
 • एल (कुर्ला) 19 
 • एम पश्‍चिम (चेंबूर) 11 
 • एम पूर्व (देवनार, मानखुर्द) 2 
 • एन (घाटकोपर) 52 
 • एस (विक्रोळी, भांडूप) 4 
 • टी (मुलुंड) 49 
 • एच पूर्व (वांद्रे, सांताक्रूझ पूर्व) 27 
 • एच पश्‍चिम (वांद्रे, खार पश्‍चिम) 51 
 • के पूर्व (अंधेरी, जोगेश्वरी पूर्व) 31 
 • के पश्‍चिम (अंधेरी, जोगेश्वरी पश्‍चिम) 37 
 • पी दक्षिण (गोरेगाव) 5 
 • पी उत्तर (मालाड) 28 
 • आर दक्षिण (कांदिवली) 17 
 • आर मध्य (बोरिवली) 17 
 • आर उत्तर (दहिसर) 3 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four hundred and fifty buildings are dangerous Notice of Mumbai Municipal Corporation