मुंबईच्या नळ बाजारातून 4 लाखांचा बनावट तेलाचा साठा जप्त

भाग्यश्री भुवड
Saturday, 5 December 2020

नळ बाजार, बोहरा इमाम रोड, हंसराज खिमराज अँड कंपनीत बनावट तेलाचा साठा असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाली. 

मुंबई: मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेत अन्न आणि औषध प्रशासन विभागाने बनावट तेलाचा साठा करणाऱ्यांविरोधात तीव्र मोहीम हाती घेतली आहे. नळ बाजार, बोहरा इमाम रोड, हंसराज खिमराज अँड कंपनीत बनावट तेलाचा साठा असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाली. 

त्वरित एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दुकानात छापा टाकत 2 लाख 50 हजार 315 किलोचा 4 लाख 81 हजार 118 रुपयांचा बनावट तेलाचा साठा जप्त केला. बनावट तेलाचे नमुने घेत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे एफडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हंसराज खिमराज अँड कंपनीत बनावट तेलाचा साठा जप्त करण्यात आला असून पाम तेल, रिफाईंड पालमोनियन तेल, रिफाईंड सनफ्लावर तेल, रिफाईंड ग्रोनेट तेल असा 2 लाख 50 हजार 315 किलो बनावट तेलाचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 4 लाख 81 हजार 118 रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान, तेलाची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेली नाही, अनहायजेनिक साठा, नामांकित कंपनीच्या नावाचा वापर केल्याचा संशय अशा विविध कारणांवरुन या दुकानातून साठा जप्त करण्यात आला असून दुकानदारास वस्तू विक्री करण्यास बंदी घातल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

अधिक वाचा-  चैत्यभूमीला पोलिसांचा पहारा, शिवाजीपार्क पहिल्यांदाच मोकळे

ही कारवाई एफडीएचे वरिष्ठ अधिकारी जी.एम. कदम, वाय. एस. कनसे आणि ही कारवाई एफडीए आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

four lakh worth fake oil seized in mumbai nal bazar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four lakh worth fake oil seized in mumbai nal bazar