रोज वटताहेत चार लाख धनादेश

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

नोटाबंदीने वापराचे प्रमाण वाढले, बॅंकांच्या क्‍लिअरिंग यंत्रणेचे मात्र हाल
मुंबई - डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बॅंकिंग आणि ऑनलाइन ट्रान्सफरच्या जमान्यात विस्मृतीत गेलेल्या धनादेशाला (चेक) नोटाबंदीमुळे सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या सहा आठवड्यात धनादेश वापराचे प्रमाण दुपटीने वाढले असून बॅंकांच्या पश्‍चिम परिक्षेत्रात (वेर्स्टन ग्रीड) दररोज सरासरी चार लाख धनादेश वटवले जात आहेत. विशेष म्हणजे 25 हजारांखाली मूल्य असलेल्या धनादेशांची संख्या सर्वाधिक आहे.

नोटाबंदीमुळे पैसे काढण्यावर मर्यादा आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांबरोबरच सर्वसामान्य खातेदारही 10 ते 20 हजारांचे व्यवहारांसाठी धनादेश वापरत आहेत. त्यामुळे बॅंकांच्या क्‍लिअरिंग यंत्रणेवर (बॅंकांची सेवा शाखा) ताण वाढला आहे. नोटाबंदीपूर्वी प्रत्येक बॅंक शाखेच्या व्यवहारांमध्ये सरासरी 20 टक्के धनादेशाचे प्रमाण होते. मात्र नोटाबंदीनंतर मोठ्या रकमेचे व्यवहार करण्यासाठी अनेकांनी धनादेशाचा आधार घेतला आहे. यामुळे बॅंकांमध्ये इनवर्ड आणि आउटवर्ड चेकचे प्रमाण 40 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे.

महाराष्ट्र, गुजरात, गोवा, छत्तीसगड, मध्य प्रदेश या वेर्स्टन ग्रीडमधील चेक वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या पट्ट्यात 158 सरकारी, खासगी आणि सहकारी बॅंका असून यात दररोज सरासरी चार लाख धनादेश वटवले जात आहेत. आजच्या घडीला बॅंक ऑफ महाराष्ट्रामध्ये दररोज 70 ते 75 हजार धनादेश वटवले जात आहेत. धनादेशाचे प्रमाण दुपटीने वाढल्याचे सेवा शाखेशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले. नोटाबंदीपूर्वी बॅंक ऑफ महाराष्ट्रात सरासरी 30 हजार धनादेश वटवले जात होते. भारतीय स्टेट बॅंकेकडे सरासरी 1 लाख 60 हजार ते 1 लाख 80 हजार धनादेश वटवले जात आहेत.

अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे धनादेश वटवण्यास उशीर
धनादेश वटवण्याची कामे करणाऱ्या सेवा शाखेमधून होतात. प्रत्येक बॅंकेची सेवा शाखा असून यात 70 ते 80 कर्मचाऱ्यांचा ताफा असतो. प्रत्येक शाखेत एक कर्मचारी चेकची ने-आण करण्यासाठी असतो. सेवा शाखेचे काम सर्वसाधारणपणे पहाटे पाच वाजता सुरू होऊन रात्री 11 पर्यंत चालते. मात्र धनादेशांचे व्यवहार वाढत असून या कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे. त्याचबरोबर कॉम्प्युटर सिस्टीमवर लोड वाढल्याने इमेज अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे धनादेश वटवण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यामुळेही सर्वसामान्यांचा मनस्ताप वाढला आहे.

Web Title: Four million checks a day pass