चार महिन्यात मोटरमनच्या प्रसंगावधानाने वाचले १२ जणांचे जीव! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Railway

मध्य रेल्वेच्या मोटरमनने प्रसंगावधान दाखवल्याने एप्रिल ते ऑगस्ट 2022 या कालावधीत वेळेवर आणि तत्पर कारवाई करून बारा प्रवाशांचा प्राण वाचवले आहे.

चार महिन्यात मोटरमनच्या प्रसंगावधानाने वाचले १२ जणांचे जीव!

मुंबई - मध्य रेल्वेच्या मोटरमनने प्रसंगावधान दाखवल्याने एप्रिल ते ऑगस्ट 2022 या कालावधीत वेळेवर आणि तत्पर कारवाई करून बारा प्रवाशांचा प्राण वाचवले आहे. त्यापैकी चार प्रवाशांचे प्राण ऑगस्ट 2022 मध्ये वाचले आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्ट 2022 रोजी मोटरमन संजय कुमार चौहान यांनी ठाणे-अंबरनाथ लोकलवर काम करत असताना एक प्रवासी ट्रेनच्या समोर रुळावर पडलेली पाहिली, त्यांनी तात्काळ आपत्कालीन ब्रेक लावला आणि गाडी (ट्रेन) थांबवली. तो माणूस नंतर उठला आणि ट्रॅकवरून निघून गेला आणि त्याचा आत्महत्येचा प्रयत्न टळला त्यामुळे एक मौल्यवान जीव वाचला.28 ऑगस्ट 2022 रोजी मोटरमन जी एस बिस्ट हे टिटवाळा- सीएसएमटी लोकलवर काम करत असताना, अंदाजे 55 ते 56 वर्षे वयोगटातील एक महिला दिवा-ठाणे धीम्या मार्गावर रेल्वे रुळाच्या मध्यभागी येऊन ट्रेनसमोर उभी राहिली.जीएस बिस्ट यांनी तात्काळ आपत्कालीन ब्रेक लावले आणि महिलेच्या काही मीटर आधी ट्रेन वेळेत थांबवली आणि तिचा जीव वाचवला. त्याने तिला दोन महिला प्रवाशांच्या मदतीने रुळावरून हटवले, तिला ठाण्यापर्यंत ट्रेनमध्ये नेले आणि तिला ड्युटीवर असलेल्या जीआरपी ठाण्याच्या ताब्यात दिले.

27 ऑगस्ट 2022 रोजी मोटरमन

एस. व्ही. जाधव यांनी सीएसएमटी- ठाणे येथे कर्तव्यावर असताना, एक मुलगी चिंचपोकळी-भायखळा अप लोकल मार्गादरम्यान रुळावर येताना दिसली. त्याने लगेचच काही फूट आधी ट्रेन थांबवून मुलीचा जीव वाचवला. तर 19 ऑगस्ट 2022 रोजी मोटरमन राम शब्द यांनी अंबरनाथ- सीएसएमटी या ट्रेनमध्ये काम करत असताना, चिंचपोकळी स्थानकात प्रवेश करताना, एक मुलगा दिसला ज्याचे वय अंदाजे 19-20 वर्ष असावे त्याने, ट्रॅकच्या मध्यभागी उडी मारली आणि ट्रेनसमोर उभा राहिला. मोटरमन राम शब्द यांनी तात्काळ इमर्जन्सी ब्रेक लावला आणि ट्रेन थांबवली त्यामुळे त्याचा जीव वाचला. प्रवाशांच्या जीव वाचवण्याच्या 12 घटनांपैकी 4 जीव वाचवण्याच्या घटना ऑगस्टमध्ये, 2 प्रकरणे जुलै मध्ये, 3 प्रकरणे जून मध्ये, 2 प्रकरणे मे मध्ये आणि 1 प्रकरण एप्रिलमध्ये घडले.

Web Title: Four Months 12 People Lives Were Saved Due To The Incident Of Motorman

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :MumbaiLifecentral railway