

Mumbai Crime Four Policemen Accused Of Rs 20 Lakh Theft
Esakal
मुंबईत कारवाईच्या बहाण्याने घरात घुसून पोलिसांनी २० लाखांची रोकड आणि १५ तोळे सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर आता चारही पोलिसांना अटक करण्यात आलीय. या प्रकऱणी बांगलादेशी महिलेनं आरोप केले होते. तिच्या आरोपात तथ्य असल्याचं आढळल्यानंतर चेंबूरच्या आरसीएफ पोलीस पथकासह एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती समजते.