esakal | #COVID19 - मुंबई आणि नवी मुंबईत 'इतके' कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले...
sakal

बोलून बातमी शोधा

#COVID19 - मुंबई आणि नवी मुंबईत 'इतके' कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले...

#COVID19 - मुंबई आणि नवी मुंबईत 'इतके' कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्रात दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. अशात महाराष्ट्रात पुण्यात सर्वाधित कोरोनाबाधित केसेसे आहेत. या पाठोपाठ मुंबईतही आता कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना पाहायला मिळतोय.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत चार नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामुळे राज्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह केसेसची संख्या 37 वर गेली आहे. आज मुंबईत ३ आणि नवी मुंबईत १ असे चार नवीन रुग्ण सापडलेत. मुंबई नवी मुंबई भागातून आणखी नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढलीये. 

मुंबई आणि नवी मुंबईतील वाढलेल्या कोरोनाग्रस्तांच्या केसेकमुळे आता प्रशासनाकडून हे चार रुग्ण कुणाच्या संपर्कात होते याबाबत चौकशी केली जातेय. 

गरज नसतानाही तोंडाला मास्क लावून फिरणे म्हणजे आजारांना आमंत्रण

कोरोनाच्या धसक्‍यामुळे गरज नसतानाही तोंडाला मास्क लावून फिरणे आजारांना आमंत्रण ठरू शकतात.मास्क वापरण्या बरोबरच ते हाताळण्याचीही पध्दत आहे. ते जर योग्य पध्दतीने न हातळल्यास हवेतील फ्ल्यू जन्य आजार होऊ शकतात. "मास्कच्या बाहेरील भागावर विषाणू जमा झालेले असतात. त्या बाहेरील भागाला हात लागल्यावर तो हात डोळे, नाकाच्या संपर्कात आल्यास विषाणूचा फैलाव होऊ शकतो. असे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

सॅनिटायझरचा अतिवापर आहे प्रचंड हानिकारक

कोरोना विषाणूच्या भितीने स्वच्छतेचा अतिरेक सुरु झाली असून सॅनिटायझराच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, हा अतिरेकी वापरही हातांसाठी घातक ठरू शकतो. वारंवार सॅनिटायझर वापरल्याने हातावरील त्वचेला हानी पोहचून बाहेरील विषाणू, जिवाणू रोखून धरण्याची क्षमता कमी होऊ शकते. हाताची आणि शरीराची संसर्गाशी लढण्याची क्षमताही कमी होऊ शकते.असा दावा केला जात आहे.

four new positive cases of corona detected in mumbai maharashtra count goes on 37

loading image
go to top