हातावर 'होम क्वारंटाईन'चा शिक्का घेऊन 'ते' निघाले होते सुरतला, ट्रेनमध्ये लोकांनी शिक्का पाहून...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

मुंबई : "क्वारटाईन' शिक्का असलेल्या चार प्रवाशांना रेल्वेगाडीतून उतरवल्याची घटना पालघर स्थानकात घडली आहे. वांद्रे टर्मिनसवरून दिल्ली गरीबरथ एक्‍स्प्रेसमध्ये चढलेल्या चार जर्मन प्रवाशांच्या हातांवर "क्वारंटाईन' शिक्के असल्याचे अन्य प्रवाशांना दिसले. त्यामुळे त्यांनी पालघर स्थानकात गाडी थांबवून या चौघांना खाली उतरवले. 

गरीबरथ एक्‍स्प्रेसमधील डबा क्रमांक जी-4, जी-5 मध्ये हे चार प्रवासी बसले होते. जर्मनीचे नागरिक असलेल्या या चौघांना सुरतला जायचे होते. परंतु, त्यांच्या हातांवरील "क्वारंटाईन' शिक्के बघून अन्य प्रवासी घाबरले. त्यांनी पालघर स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली. त्यानंतर गाडी थांबवून या चौघांना खाली उतरवण्यात आल्याची माहिती पश्‍चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. 

Inside Story : कोरोनाची दहशत आणि पॅरासिटामॉलची गोळी....

या प्रवाशांची मुंबईत दाखल झाल्यानंतर मुंबई आतंराष्ट्रीय विमानतळावर वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. मात्र वैद्यकीय चाचणीत कोरोनासदृष्य कुठलेही लक्षण न आढळल्यामुळे या प्रवाशांना 14 दिवसाच्या विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला होता. 

रेल्वे गाडी थांबल्यानंतर या चारही प्रवाशांना पालघरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर या प्रवाशांना रस्ते मार्गे जाण्याची परवानगी डॉक्‍टरांनी दिली. गरीबरथ एक्‍स्प्रेसचा पालघर रेल्वे स्थानकावर थांबा नाही. मात्र सहप्रवाशांनी हा मुद्दा उपस्थित केल्यामुळे रेल्वेगाडी थाबण्यात आली होती. 

four passengers with home quarantine stamp busted in garib rath express

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four passengers with home quarantine stamp busted in garib rath express