अमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

मुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) चार ठिकाणी कारवाई करून साडेसोळा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यात एका नायजेरियन व्यक्तीचा समावेश आहे. त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. 

अंधेरीच्या उड्डाणपुलाजवळ काही परदेशी नागरिक एमडी विकायला येणार असल्याची माहिती एएनसीच्या वांद्रे युनिटला मिळाली. गुरुवारी (ता. 15) पोलिसांनी सापळा रचून 26 वर्षीय नायजेरियन व्यक्तीला ताब्यात घेतले. चिनोन्सू उदेगू असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पाच लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले. त्याचप्रमाणे आझाद मैदान युनिटने कुर्ला येथील कल्पना सिनेमागृहाच्या परिसरातील लाला कंपाऊंडमधून असगरअली अन्वरलुलूस शेख (रा. गोवंडी) याला अटक केली. त्याच्याकडून दीड किलो चरस जप्त केले आहे. त्याची किंमत पावणेसहा लाख रुपये आहे. कांदिवली युनिटनेही 750 ग्रॅम चरस जप्त केले आहे. या प्रकरणी सलीम हबीब खान ऊर्फ सलीम टेम्पो (रा. मालवणी) याला पोलिसांनी अटक केली. गुरुवारी रात्री वरळी युनिटने लोअर परळ परिसरात राजन पोंडूकोडे ऊर्फ राजन ऊर्फ निखिलला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख 62 हजार रुपयांचे एलएसडी पेपर आणि 77 हजारांचे एमडी ड्रग्ज जप्त केले. त्या चौघांना पोलिसांनी एनडीपीएस कायद्याखाली अटक केली. 

Web Title: Four people who sell drugs are arrested