जरासं दुर्लक्ष आणि चार वर्षांचा आरिफ आई वडिलांना सोडून गेला...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 मार्च 2020

मानखुर्द - आपली मुलं कुणासोबत खेळतात, कुठे खेळतात याची तुम्हाला माहिती असते का ? अनेकदा घरात मुलगा मस्ती करायला लागला की अनेकांकडून, 'जा रे किंवा जा ग जरा बाहेर खेळून ये' असं सांगितलं जातं. मात्र आपल्या पाल्यांवर आपलं लक्ष असणं अत्यंत महत्त्वाचंआहे.  'नजर हटी, दुर्घटना घटी' बोललं जातं ते आपल्या मुलांना पण लागू होतं. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईतील गोवंडीत घडलाय.     

मोठी बातमी - मुंबईत उभारण्यात येणाऱ्या 'मुंबई आय' प्रकल्पाबाबत मोठी बातमी...  

गोवंडी येथील शिवाजी नगरमध्ये मंगळवारी (ता. 10) सायंकाळी शौचालयाच्या टाकीत पडून चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. अरिफ शेख असे त्याचे नाव असून खेळताना तोल जाऊन तो टाकीत पडला. 

शिवाजी नगरच्या भूखंड क्रमांक चाळीसजवळ सहाव्या रस्त्यालगत शौचालयाचे बांधकाम सुरू आहे. त्याच्या सेप्टिक टॅंकमध्ये बांधकामासाठी तात्पुरता पाणीसाठा करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी खेळताना अरिफ त्या ठिकाणी गेला. टाकीवरील झाकणावर तो उभा असताना तोल जाऊन आत पडला. माहिती मिळाल्यानंतर त्याला तत्काळ बाहेर काढून घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तेथे दाखल करण्यापूर्वीच डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. 

मोठी बातमी - सावधान ! आजच सोडा धूम्रपान, नाहीतर भोगा 'हे' गंभीर परिणाम

त्यामुळे, वरील बातमी वाचून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपली मुलं कुठे जातात, कुठे खेळतात यावर लक्ष ठेवणं किती गरजेचं आहे. तुमचं जरासं दुर्लक्ष झालं तर होत्याचं नव्हतं होऊ शकतं. त्यामुळे सजग राहा , काळजी घ्या. 

four years boy arif from gowandi lost his life after drawing in drainage tank

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four years boy arif from gowandi lost his life after drawing in drainage tank