esakal | रायगडात पाच दिवसात आढळले चौदा हजार गंभीर आजाराचे रुग्ण; आरोग्य सर्वेक्षणात आढळली धक्कादायक माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

रायगडात पाच दिवसात आढळले चौदा हजार गंभीर आजाराचे रुग्ण; आरोग्य सर्वेक्षणात आढळली धक्कादायक माहिती

कोरोना रुग्णांच्या शोधमोहिमेसाठी राबवण्यात येत असलेल्या 'माझा परिवार माझी जबाबदारी' मोहिमेत कोरोना रुग्णांपेक्षा अतिगंभीर रुग्णांचाच शोध जास्त प्रमाणात लागत आहे.

रायगडात पाच दिवसात आढळले चौदा हजार गंभीर आजाराचे रुग्ण; आरोग्य सर्वेक्षणात आढळली धक्कादायक माहिती

sakal_logo
By
महेंद्र दुसार

अलिबाग : कोरोना रुग्णांच्या शोधमोहिमेसाठी राबवण्यात येत असलेल्या 'माझा परिवार माझी जबाबदारी' मोहिमेत कोरोना रुग्णांपेक्षा अतिगंभीर रुग्णांचाच शोध जास्त प्रमाणात लागत आहे. मागील पाच दिवसात मधुमेह, उच्चरक्तदाब, किडनी, लिव्हर खराब होणे या सारख्या गंभीर आजाराचे एकूण 13 हजार 860 रुग्ण सापडले आहेत. तर याच दरम्यान सर्वेक्षणादरम्यान केवळ 7 नविन कोरोना रुग्ण सापडले आहेत.

महाराष्ट्रातही समूह संसर्गच, दिवाळीनंतर रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याची शक्यता - आयएमएम

मंगळवार,  (ता. 20) रोजी एकाच दिवसात 3 हजार 086 गंभीर आजारांचे रुग्ण आढळले आहेत. रुग्ण शोध मोहिम दुसऱ्या टप्प्यात असून आतापर्यंत 45 हजार कुटुंबीयांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले आहेत. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना या गंभीर आजारांमुळे पुन्हा त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी येत आसल्याने आरोग्य विभागाकडून अशा प्रकारच्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. आरोग्य विभागाकडे जिल्ह्यातील गंभीर रुग्णांची माहिती, त्यांच्या आजाराची स्थितीची माहिती तयार आहे. पुढील कालावधीत सद्या असलेला 3.00 मृत्यूदर घटवण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांचे म्हणणे आहे. सर्वेक्षणात शोधण्यात आलेल्या रुग्णांच्या आरोग्याकडे लक्ष  दिल्यास मृत्यूदर कमी होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाला आहे. सर्वेक्षणातून आलेल्या आकडेवारीनुसार रायगड जिल्ह्यात उच्चरक्तदाब आणि मधुमेहाचे रुग्ण जास्त प्रमाणात आहेत.

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, जयंत पाटलांची घोषणा

कोरोनामुळे आतापर्यंत 1 हजार 488 व्यक्ती कोरोनामुळे दगावल्या आहेत. यातील बहुतांश व्यक्तीं गंभीर आजाराने त्रस्त होत्या. यातच कोरोनावरील उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हणणे आरोग्य विभागाचे आहे. यामुळे सर्वेक्षणात जमा केलेल्या माहितीनुसार आरोग्य विभागाला गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांवर बारकाईने लक्ष देणे शक्य होणार असल्याचे डॉ. सुधाकर मोरे यांचे म्हणणे आहे.
*
सर्वेक्षण मोहिमेवरील दृष्टीक्षेप
रायगड जिल्ह्याची एकूण लोकसंख्या
सर्वे झालेले कुटुंब - 2 लाख 14 हजार 590
नागरिकांची संख्या - 19 लाख 34 हजार 827
सापडलेले कोरोना रुग्ण - 7
मधुमेह - 4 हजार 999
उच्चरक्तदाब - 6 हजार 433
किडनी - 52
लिव्हर- 43
इतर गंभीर आजार - 2 हजार 333
एकूण गंभीर रुग्ण - 13 हजार 860

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )