येमेन, सौदी युद्धातील सैनिक मुंबईत येऊन घायाळ; दोघांना पुण्यातून अटक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

येमेन देशातून उपचारासाठी आलेल्या विदेशी सैनिकाला मोफत उपचार देण्याच्या बहाण्याने दोघा विदेशी भामट्यांनी दोन लाख पाच हजार रुपयांचा गंडा घतला होता. या प्रकरणी पवई पोलिसांनी दोघा जणांना पुण्यातून ताब्यात घेतले आहे.

अंधेरी : येमेन देशातून उपचारासाठी आलेल्या विदेशी सैनिकाला मोफत उपचार देण्याच्या बहाण्याने दोघा विदेशी भामट्यांनी दोन लाख पाच हजार रुपयांचा गंडा घतला होता. या प्रकरणी पवई पोलिसांनी दोघा जणांना पुण्यातून ताब्यात घेतले आहे.

ही बातमी वाचली का? धक्कादायक! राज ठाकरेंच्या घरात कोरोनाची एन्ट्री

फहाद रिझवान अब्दुला आलमक्तरी (वय 33 रा. येमेन) आणि अली अब्दुलगनी अलगूजी(24 रा. येमेन) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.  फिर्यादी मोहम्मद गुरबान सलेह गुरबान (26) हा येमेन देशाचा सैनिक आहे. येमेन आणि सौदी देशातील अंतर्गत युद्धात जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी भारतात पाठविण्यात आले होते. दरम्यान त्यांना दोन्ही आरोपींची गाठून भांडुपच्या फोर्टीज रुग्णालयापेक्षा नवी मुंबईतील रुग्णालयात मोफत उपचार करण्याचे अमिष दाखविले. 

ही बातमी वाचली का? हात दिला की खांद्यावर बसायचं ! पनवेलमध्ये बारचालक आता काय करतायत वाचा...

आरोपीमधील एका आरोपीने येमेन दुतावासाचे दिल्ली कमिटीचे सदस्य असल्याची बतावणी करून उपचाराचा खर्च हा येमेन देशाकडून परस्पर घेण्यात येईल असे अमिष दाखवत दोघा आरोपींनी त्यांचे पासपोर्ट ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्या खात्यावरून तब्बल दोन लाख पाच हजार रुपये ट्रान्सफर केले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच फिर्यादी गुरबान याने पवई पोलीस ठाण्यात आरोपी फहाद रिझवान अब्दुला आलमक्तरी आणि अली अब्दुलगनी अलगूजी यांच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दिली.

ही बातमी वाचली का? दिल्लीपाठोपाठ मुंबईतील हॉटेलमध्येही चीनींना प्रवेशबंदी? वाचा सविस्तर...

चोवीस तासांत आरोपीं ताब्यात
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक तपासद्वारे 24 तासात आरोपीना पुण्यातून अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता एक जुलै पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांनी आरोपींच्या अधिक चौकशीत फिर्यादी गुरबान सह पाच जणांचे पासपोर्ट हस्तगत केले आहेत. अधिक तपस पवई पोलिस करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud a foreign soldier under the pretext of free treatment in mumbai 2 persons arrested from Pune