esakal | दिल्लीपाठोपाठ मुंबईतील हॉटेलमध्येही चीनींना प्रवेशबंदी? वाचा सविस्तर...
sakal

बोलून बातमी शोधा

chinese people

दिल्लीतील हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनेने चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकताना हॉटेलमध्ये चीनी नागरीकांना खोल्या न देण्याचे ठरवले आहे. हाच निर्णय मुंबईतील संघटना घेण्याचा विचार करीत आहे.

दिल्लीपाठोपाठ मुंबईतील हॉटेलमध्येही चीनींना प्रवेशबंदी? वाचा सविस्तर...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : कोरोना महामारीचा वाढता प्रादूर्भाव आणि त्यातच चीनच्या सीमेवरील वाढता तणाव यामुळे चीनविरुद्धचा विरोध सतत तीव्र होत आहे. चीनी वस्तूंवरील बहिष्काराची मागणी जोर धरत असतानाच मुंबईतील हॉटेलमध्ये चीनी नागरीकांना प्रवेश नाकारण्याचा विचार लवकरच होण्याची शक्यता आहे. 

कोरोनाचा असाही फटका; 30 वर्षानंतर प्रथमच ठाण्यातील सर्वात मोठी स्पर्धा रद्द.. 

मुंबईतील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मालकांनी चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्यास सुरुवात केली. आता बजेट हॉटेल आणि गेस्ट हाऊस मालकांनी चीनी नागरीकांना खोल्या न देण्याचा विचार करीत आहेत. अर्थात यात पंचतारांकीत हॉटेल सहभागी होणार नाहीत, असाच अंदाज व्यक्त केला जात आहे. 

मुंबईत कंटेन्मेंट झोनची संख्या वाढली; तब्बल 'इतक्या' इमारती केल्यात सील...

दिल्लीतील हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनेने चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकताना हॉटेलमध्ये चीनी नागरीकांना खोल्या न देण्याचे ठरवले आहे. हाच निर्णय मुंबईतील संघटना घेण्याचा विचार करीत आहे. भारतीय ट्रेडर्स महासंघांने चीनी वस्तूंवर बहिष्कार तीव्र करण्यासाठी भारतीय वस्तू-आमचे लक्ष्य ही मोहीम सुरु केली आहे. त्यानुसारच हॉटेल संघटनाही चीनीविरुद्धची मोहीम तीव्र करीत आहेत. मुंबईतील हॉटेल संघटनांची बैठक शनिवार अपेक्षित आहे. 

सोमवारपर्यंत मृत्यूंची माहिती सादर करा; अन्यथा कठोर कारवाई... वाचा सविस्तर...

सध्या आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद आहेत, पण भविष्यात ती सुरु होतील. त्यावेळी भारतात येणारे चीनचे नागरीक मुंबई दिल्लीतच नव्हे तर पुणे, आगरा, बंगळूर येथे जातात. हे पर्यटनासाठी येतात तसेच आपल्या बिझनेससाठी येत असतात. दिल्लीतून सुरु झालेल्या मोहीमेस मथुराने पाठिंबा दिला आहे. मुंबईतील मोहीम यशस्वी होण्यासाठी विविध हॉटेल मालकांबरोबर संपर्क साधला जात आहे, असेही काहींनी सांगितले.

loading image