"एलईडी लाईट'च्या साह्याने महिला प्रवाशाची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

टॅक्‍सीमध्ये एलईडी लावून प्रवाशांना लुटणारे टोळके सध्या कार्यरत असून, दादर पूर्व येथे प्रवासी महिलेची या टोळक्‍याने अशाच पद्धतीने फसवणूक केली. याप्रकरणी पद्मावती कृत्ताहामी स्वामी (40) यांनी टॅक्‍सीचालक व त्याच्या साथीदाराविरोधात माटुंगा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. सीसी टीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू आहे. 

मुंबई - टॅक्‍सीमध्ये एलईडी लावून प्रवाशांना लुटणारे टोळके सध्या कार्यरत असून, दादर पूर्व येथे प्रवासी महिलेची या टोळक्‍याने अशाच पद्धतीने फसवणूक केली. याप्रकरणी पद्मावती कृत्ताहामी स्वामी (40) यांनी टॅक्‍सीचालक व त्याच्या साथीदाराविरोधात माटुंगा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. सीसी टीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू आहे. 

मानखुर्द येथील अणुशक्ती नगरमध्ये पद्मावती राहतात. 21 मे रोजी त्यांनी दादर रेल्वेस्थानकाबाहेरून मानखुर्दला जाण्यासाठी टॅक्‍सी पकडली. त्या वेळी साडेतीनशे रुपयांचे भाडे ठरले होते. मानखुर्दला पोहोचल्यावर पद्मावती यांनी दोन हजारांची नोट चालकाशेजारी बसलेल्या व्यक्तीला दिली; पण त्याने पाचशेच्या तीन नोटांऐवजी दोनशेच्या तीन नोटा त्यांना दिल्या. टॅक्‍सीतील भडक एलईडी लाईटमुळे त्या पद्मावती यांना दिसल्या नाहीत. खाली उतरल्यावर त्यांना पाचशेऐवजी आरोपींनी दोनशेच्या नोटा देऊन फसवणूक केल्याचे लक्षात आले. तसेच पद्मावती यांनी चालकाशेजारी बसलेल्या व्यक्तीलाही सांगितले; पण त्यांनी बाकीचे पैसे न देताच टॅक्‍सी तिथून पळवली. 

Web Title: fraud in mumbai