वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थानामध्ये सव्वातीन कोटींचा अपहार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील श्री वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थानात जवळपास सव्वा तीन कोटी रुपयांच्या अपहार झाला आहे. या प्रकरणी विश्वस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष मनोज प्रधान यांच्या विरोधात विद्यमान अध्यक्ष कल्पेश पाटील यांनी आर्थिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामिण यांच्याकडे  तक्रार केली आहे.

वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील श्री वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थानात जवळपास सव्वा तीन कोटी रुपयांच्या अपहार झाला आहे. या प्रकरणी विश्वस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष मनोज प्रधान यांच्या विरोधात विद्यमान अध्यक्ष कल्पेश पाटील यांनी आर्थिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामिण यांच्याकडे  तक्रार केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी देवी मंदिर हे सुपरिचित असे देवस्थान आहे. या देवस्थानचा कारभार वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थान पहाते. या देवस्थानावर ऐकूण पाच विश्वस्त काम पाहतात. सदर विश्वस्त निवड प्रकिया ही धर्मादाय आयुक्त व जिल्हा न्यायालय ठाणे यांच्या मार्फ़त केली जाते. त्यामध्ये चार विश्वस्त नेमले जातात व एक परंपरागत विश्वस्त असे ऐकूण पाच जण  येथील मंदिर कारभार चालवितात. 2014 मध्ये पाच वर्षांसाठी सदर मंडळ नेमण्यात आले. त्यामध्ये येथील अध्यक्षपदी मनोज प्रधान हे ठाणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व शहराध्यक्ष असून, त्याच्या चेअरमन पदासाठी निवड करण्यात आली होती. पदांच्या कालावधीत ठेवण्यात आलेल्या मुलुंड येथील कॉर्पोरेशन बँक शाखेत असलेल्या मुदत ठेवी बनावट निघाल्या आहे.

तसेच 18 जुलै 2018 रोजी विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष म्हणुन कल्पेश पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मनोज प्रधान यांनी मुदत संपलेल्या ठेवी पुर्नगुंतवणुक केल्याच्या पावत्या संस्थानाकडे जमा केल्या असता. त्याबाबत संशय आल्याने त्यांनी मुलुंड येथील कॉर्पोरेशन बॅंक शाखेत धाव घेतली असता. हा प्रकार उघड झाला असुन, सदरच्या रक्कमेचा अपहार मनोज प्रधान यांनी केल्याचा खुलासा संस्थान कडे लेखी दिला. त्यात त्यानी हमी पत्र लिहून दिले की मला आर्थिक अड़चण होती. म्हणून मि असे केले आहे.  मात्र या प्रकरणी देवीच्या पैशाच अपहार केल्याचे निदर्शनस आल्याने विदयमान अध्यक्ष कल्पेश पाटील यांनी गणेशपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यामुळे पंचक्रोषित खळबळ उडाली आहे. यानंतर देखील काही  प्रकरणात चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावीत अशी  मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

Web Title: fraud in Vajreshwari Yogini devi devasthan