म्हसा येथील आरोग्य शिबिरात 1300 रुग्णांची मोफत तपासणी

मुरलीधर दळवी
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

मुरबाड (ठाणे) - जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था झडपोली यांच्यातर्फे म्हसा येथे बुधवारी ता 15 आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरास परिसरातील ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.

शिबिरात 1300 रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये मोतिबिंदूंचे १२८ रुग्ण आढळले त्यांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात येणार आहे १७८ रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले. तसेच ६७ रुग्णांना कानाची मशीन मोफत देण्यात येणार आहेत.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परमार्थ शेतकरी समाज आळंदी धर्मशाळेचे अध्यक्ष रघुनाथ बांगर, खामलिंगेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दशरथ पष्टे, शहापुरचे नगरसेवक हरेश पष्टे, रामचंद्र कुर्ले, डॉ सोपान सांबरे, डॉ विजय यादव, अरुण कुर्ले, जिजाऊ संस्थेचे सचिव केदार चव्हाण, निलेश पष्टे उपस्थित होते. कै बाळकृष्ण पुर्णेकर यांच्या प्रथम पुण्यतिथी व 
मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश शेट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त म्हसा येथे हे आरोग्य शिबीर संपन्न झाले. वेदांत हॉस्पिटल व भक्तीवेदांत हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर व त्यांची सर्व टीम उपस्थित होती. शिबीरासाठी खामलिंगेश्वर देवस्थान मंदीर ट्रस्ट म्हसा येथील सदस्य व म्हसा ग्रामस्थांचे युवकांचे विशेष सहकार्य लाभले.

Web Title: Free check-up of 1300 patients in Health Camp at Mhsa