

Mumbai Open Science Park
ESakal
मुंबई : मुंबईतील चर्नी रोड येथे असलेल्या महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवनच्या आवारात ‘मुक्त विज्ञान उद्यान’ (Open Science Park) उभारण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ही घोषणा केली. या प्रसंगी, सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट आणि महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन यांच्यात एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.