आता महापालिकेचे विद्यार्थी गाजवणार मैदान, विद्यार्थ्यांना मिळणार मोफत क्रिडा प्रशिक्षण

आता महापालिकेचे विद्यार्थी गाजवणार मैदान, विद्यार्थ्यांना मिळणार मोफत क्रिडा प्रशिक्षण

मुंबई, ता. 24 : वस्त्यांमधून शिक्षणासाठी महापालिका शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यानी अभ्यासाबरोबर मैदानही गाजवले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारा नरसिंह यादव हाही पालिका शाळेतील विद्यार्थ्यी. पालिकेच्या अनेक विद्यार्थ्यांनी राज्य आणि देश पातळीवर नाव मिळवले आहे. अशा विद्यार्थ्यांना संधी मिळवून देण्यात येणार आहे. अंधेरी पश्‍चिम येथील क्रिडा अकादमीत या विद्यार्थ्यांना खेळांचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. त्याचबरोबर मुलींना क्रिकेटचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे.

अंधेरी येथील मॉडल टाऊन रेसिडन्स वेल्फेअर असोएिशनच्या वतीने चाचा नेहरू उद्यानात क्रिडा अकादमी सुरु आहे. या क्रिडा अकदामीत क्रिकेट, आर्चरी, मार्शल आर्ट, रोलर स्केटिंग, फुटबॉल ऍथलॅटिक्‍स अशा खेळांचे माफक शुल्कात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मात्र, यात मुलींना क्रिकेट आणि स्वयंरक्षणाचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. खास पालिकेच्या विद्यार्थ्यांना सर्व क्रिडा प्रकाराचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे चेअरमनआणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी दिली.

नामवंत प्रशिक्षक या खेळांचे प्रशिक्षण देणार आहेत. "पालिका शाळांमधील मुलांनी त्यांचे नैपुण्य वेळोवेळी सिध्द केले. मात्र, आर्थिक परीस्थीतीमुळे अनेक वेळा त्यांना पुढे जात येत नाही. अशा विद्यार्थ्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे आंबेरकर यांनी सांगितले. या क्रिडा अकादमचे उदघाटन खासदार गजानन किर्तीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रिकेट पट्टू रमेश पोवार यांच्यासह विभागातील लोकप्रतिनिधी तसेच नागरीक उपस्थीत होते. सदर माहिती आंबेरकर यांनी दिली आहे.

( संपादन - सुमित बागुल )

free sports training will be given to the municipal corporation school students of mumbai

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com