प्रेमात आड येणाऱ्या मित्राचा काढला होता काटा, तब्बल 6 महिन्यानंतर मित्रासह साथीदाराला अटक

प्रेमात आड येणाऱ्या मित्राचा काढला होता काटा, तब्बल 6 महिन्यानंतर मित्रासह साथीदाराला अटक

मुंबई, ता. 24 : प्रेमाच्या आड येणाऱ्या मित्राचा मित्रानेच काटा काढल्याचा गंभीर प्रकार आरे कॉलनी परिसरात घडला. विशेष म्हणजे मृतदेहाची ओळख पटू नये, यासाठी मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचून विदृप करण्यात आला. तसेच त्याचा मोबाईलही दगडाने फोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण बेपत्ता झालेल्या तरूणाच्या हालचालींचा तंत्रज्ञानाच्या मदतीने मागोवा घेऊन, तसेच खबऱ्यांच्या माहितीवरून सहा महिन्यानंतर आरे कॉलनी पोलिसांनी मोठ्या शिताफीने ही मर्डर मिस्टरी सोडवली आहे. याप्रकरणी आरोपी मित्रासह दोघांना अटक करण्यात आली आहे.

एकवीस वर्षांच्या मुबारक प्यारेजहान सय्यद आणि तेवीस वर्षांच्या अमित उर्फ बिडी सीयाराम शर्मा अशी अटक आरोपींची नावे आहेत. मुबारकचे प्रेम असलेल्या तरुणीसोबत त्याचाच मित्र मृत रवी भगवान साबदे मोबाईलवर वारंवार बोलत असल्यामुळे ती तरुणी त्याला टाळत अल्याच्या संशयावरून राग अनावर झालेल्या मुबारक आणि अमितने रवीची आरेच्या जंगलात निर्घुण हत्या केली होती. 

जोगेश्वरी परिसरातील JVLR रोड परिसरात मुबारक आणि रवि हे एकत्र रहात होते. त्याच परिसरातील एका तरुणीसोबत मुबारकची मैत्री झाली होती. दोघंही एकमेंकासोबत मोबाइलबर बोलायचे. हे माहित असताना देखील रवी हा तरुणीशी जवळीक साधत होता. त्यामुळे संबधित तरुणी मुबारकशी बोलणं टाळू लागली. याचा राग मुबारकच्या मनात होता. त्या सुडेच्या भावनेतूनच त्याने मित्र अमित याला हाताशी धरून रवीचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार जून महिन्यात या दोघांनी रवीला आरेच्या जंगलात निर्जनस्थळी गाठून त्याला मारहाण केली. या मारहाणीत रवीचा मृत्यू झाला. रवीची ओळख पटू नये यासाठी दोघांनी त्याच्या तोंडावर दगडाने प्रहार करून त्याला विद्रुप केले.

ऐवढ्यावरच न थांबता पुरावा नष्ट करण्यासाठी त्या दोघांनी रविचा मोबाइलही दगडाने ठेचून काढला. तसेच त्याच्या अंगावरील कपडे काढून त्याला नग्न अवस्थेत जंगलातील वाहत्या पाण्याच ढकलून पळ काढला. कित्येक तास उलटले तरी रवी घरी न आल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी रवी बेपत्ता असल्याची तक्रार आरे कॉलनी पोलिस ठाण्यात नोंदवली.

या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. पोलिसांना तपासादरम्यान रवी आणि मुबारक यांच्यात संबंध ठिक नव्हते, याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मुबारक आणि अमित या दोघांची चौकशी केली. त्यावेळी दोघंही विसंगत माहिती देऊन दिशाभूल करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी खाकीचा धाक दाखवल्यानंतर दोघांनी आपल्या गुन्ह्यांची कबूली दिली. तब्बल सहा महिन्यानंतर हा क्लीष्ट गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला.

( संपादन - सुमित बागुल )

mumbai police solved complicated crime mystery duo arrested by cops after six moths 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com