पश्‍चिम रेल्वेवर लाखो फुकटे प्रवासी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

मुंबई - पश्‍चिम रेल्वेवर एप्रिलमध्ये विनातिकीट प्रवास केल्याबद्दल दोन लाख 60 हजार जणांवर कारवाई करण्यात आली. मार्चमध्ये हाच आकडा एक लाख 97 हजार होता. महिनाभरात जवळपास 63 हजार विनातिकीट प्रवासी वाढले आहेत. 

एप्रिलमध्ये केलेल्या कारवाईतून 12 कोटी 18 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मार्चमध्ये दंडातून 8 कोटी 63 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. एप्रिलमध्ये एक हजार 35 भिकारी आणि बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. दंड न भरल्याने 149 जणांना शिक्षा झाली. आरक्षित तिकीट अन्य प्रवाशाला दिल्याची 23 प्रकरणे उघडकीस आली. बेकायदा दलाल, समाजविघातक कृत्ये करणाऱ्यांविरोधात तपासणी मोहीम राबवून 111 जणांना पकडले. बारा वर्षांवरील 110 विद्यार्थ्यांवर महिलांच्या डब्यातून प्रवास केल्याबद्दल कारवाई करण्यात आली. 

Web Title: freight passengers on the Western Railway