ग्रॅण्ट रोडच्या फ्रेअर पुलावर उद्या रात्री हातोडा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

पश्‍चिम रेल्वेवरील चर्नी रोड ते ग्रॅण्ट रोड या स्थानकांदरम्यान फ्रेअर पुलावर अखेर हातोडा पडणार आहे. हा पूल गुरुवारी (ता. 16) रात्री पाडण्यात येणार असून, नवीन पुलाच्या कामासाठी गर्डर टाकण्यात येईल. नवीन पुलाचे बांधकाम सहा महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. 

मुंबई : पश्‍चिम रेल्वेवरील चर्नी रोड ते ग्रॅण्ट रोड या स्थानकांदरम्यान फ्रेअर पुलावर अखेर हातोडा पडणार आहे. हा पूल गुरुवारी (ता. 16) रात्री पाडण्यात येणार असून, नवीन पुलाच्या कामासाठी गर्डर टाकण्यात येईल. नवीन पुलाचे बांधकाम सहा महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. 

आयआयटी मुंबई, महापालिका आणि रेल्वे यांच्या संयुक्त समितीने रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल आणि पादचारी पुलांची पाहणी केली आहे. आयआयटीने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये फ्रेअर पुलाची पाहणी करून स्ट्रक्‍चरल ऑडिट केले होते. या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करण्याऐवजी नवीन पूल बांधण्याची शिफारस या संयुक्त समितीने केली आहे. अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करण्यासंदर्भात रेल्वे आणि महापालिका प्रशासनाची बैठकही झाली. 

हे  वाचलं का ः सावधान! प्रोटिन सप्लिमेंटस करतेय बॉडीची बिघाडी

या बैठकीत ग्रॅण्ट रोड स्थानकावरील मौलाना शौकत अली मार्गावरील फ्रेअर पूल अवजड वाहनांसाठी तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. फ्रेअर पूल 1921 मध्ये बांधण्यात आला होता. पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने आता हा पूल पाडून नवा पूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पुलाच्या गर्डरचे आरेखन पश्‍चिम रेल्वेने केले असून, बांधकामात चांगल्या दर्जाचे गंजरोधक पोलाद (स्टेनलेस स्टील) वापरण्यात येणार आहे. 

दृष्टिक्षेपात 
सध्याच्या पुलाची रुंदी : 16.78 मीटर 
नियोजित पुलाची रुंदी : 17.49 मीटर 
नवीन पुलावर दोन स्वतंत्र मार्गिका 
पादचाऱ्यांसाठी दोन्ही बाजूंना स्कॉयवॉक 
सहा महिन्यांत प्रवाशांच्या सेवेत 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: frere bridge will demolished tomorrow