शुक्रवारी दोन हजार 380 अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या शुक्रवारी (ता.3) शेवटचा दिवस होता. या दिवशी अनेक ठिकाणी बंडखोरी, पक्षांतरे, उमेदवारांची पळवापळव अशा वातावरणात सुमारे दोन हजार 380 जणांनी उमेदवारी अर्ज भरले. अर्ज भरण्याच्या केंद्रांवर बंडखोरीचे फुत्कार, पक्षांतर करणाऱ्यांच्या कोलांटउड्या, त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी चढाओढ, उमेदवारी नाकारल्यानंतर आलेली निराशा, तर दुसऱ्याच क्षणाला नातलगाला उमेदवारी नाकारल्यामुळे बदललेले वातावरण, असे आशा-निराशेचे खेळ पाहायला मिळाले.

शुक्रवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्याच दिवशी बहुतेक उमेदवारांनी अर्ज भरल्याने ऑनलाईन यंत्रणाही काही काळ व्यवस्थित काम करत नव्हती, अशा तक्रारी होत्या. त्यामुळे उमेदवारांची धावाधाव झाली. गोरेगावातून दोन वर्षांपूर्वी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले बलाढ्य नेते समीर देसाई यांना उमेदवारी नाकारण्यात आली, पण त्यांच्या पत्नीला तिकीट मिळाले. घाटकोपरमधील राष्ट्रवादीच्या प्रतीक्षा घुगे यांनी तर भाजप व शिवसेनेतून उमेदवारी मिळते का, याची चाचपणी केली व अखेर अपक्ष म्हणून अर्ज भरला. शेवटच्या क्षणी त्यांना कॉंग्रेसने एबी फॉर्म दिला. अशी आपल्या किंवा आपल्या नातलगांच्या तिकिटासाठी चाललेली सार्वत्रिक धडपड, खेचाखेची, तिकीट न मिळालेल्यांनी व्यक्त केलेला संताप असे वातावरण होते.

Web Title: On Friday, two thousand 380 applications filed