दोस्त दोस्त ना रहा! लग्न न करण्याचा सल्ला दिल्यानं हल्ला, ५२ वर्षीय मित्राला अटक

गप्पा मारता मारता लग्न न करण्याचा सल्ला दिल्यानं चिडलेल्या ५२ वर्षीय मित्राने सल्ला देणाऱ्या मित्रावर प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मित्राला अटक केलीय.
52 Year Old Man Held After Assaulting Friend

52 Year Old Man Held After Assaulting Friend

Esakal

Updated on

कोपरखैरणेत राहणाऱ्या एका व्यक्तीने लग्न करण्याचा सल्ला देणाऱ्या आपल्या मित्रावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सेक्टर-१९ मध्ये घडली. या हल्ल्यात त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोपरखैरणे पोलिसांनी संशयित आरोपी मित्रावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com