उल्हासनगरात मित्रानेच केली मित्राची हत्या

दिनेश गोगी
मंगळवार, 24 एप्रिल 2018

उल्हासनगर : हारलेले पैसे परत करण्यावरून झालेल्या वादविवादात मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना काल सायंकाळी उल्हासनगरात घडली आहे. आरोपी पळून जाण्याच्या बेतात असतानाच, तो कल्याण रेल्वे स्टेशनवर गुन्हे अन्वेषणच्या जाळ्यात अडकल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.

उल्हासनगर : हारलेले पैसे परत करण्यावरून झालेल्या वादविवादात मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना काल सायंकाळी उल्हासनगरात घडली आहे. आरोपी पळून जाण्याच्या बेतात असतानाच, तो कल्याण रेल्वे स्टेशनवर गुन्हे अन्वेषणच्या जाळ्यात अडकल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.

काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कॅम्प नंबर 3 मधील शांतीनगर परिसरात काही मित्र पत्ते खेळत होते. त्यात विकी खैरे आणि वाजीद खान या मित्रांचाही समावेश होता. वाजीद पैसे हारल्यावर त्याने विकिकडे पैसे परत देण्याचा तगादा लावला.वादविवाद वाढल्यावर विकीने वाजीदला दमात घेताना तुला उत्तरप्रदेशात येऊन ठार मारणार. अशी धमकी दिल्यावर वाजीदने रागाच्या भरात त्याच्याजवळील सुऱ्याने विकीच्या गळ्यावर, छातीवर वार केले.विकी जागीच ठार झाल्यावर वाजीद पळून गेला.

"गुन्हे अन्वेषणचा दर्गा,स्टेशनवर सापळा""

हत्येची माहिती समजताच उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे,पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांनी मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात जाऊन मृतक विकीच्या नातलगांकडे चौकशी केली असता,ही हत्या वाजीद खान याने केली असून तो उत्तरप्रदेशातील गाव भावपूर,तालुका भटपुर,जिल्हा गोरखपूर येथील राहणारा असल्याचे सांगण्यात आले.वाजीद एकतर कल्याणच्या दर्ग्यात लपला असणार,किंवा तो उत्तरप्रदेशात पळून जाण्याच्या बेतात असण्याची खात्री पटल्याने गुन्हे अन्वेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महेश तरडे, मनोहर पाटील, अशरुद्दीन शेख, गणेश तोरगल या पोलीस अधिकाऱ्यांसह एस.के.पवार, उदय पालांडे, पादिर,भरत नवले, महाशब्दे, चव्हाण, कर्णे, मिसाळ, जाधव, भोसले यांनी कल्याणचा दर्गा, कल्याण, कसारा रेल्वे स्टेशनवर सापळा रचला. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वर संशयास्पद रित्या घाबरलेल्या अवस्थेत फिरणाऱ्या वाजीद खान या तरुणाला ताब्यात घेतले.

वाजीदने पत्यांच्या पैशांच्या वादातून त्याचा मित्र विकी खैरे याच्या हत्येची कबुली दिली असून त्याला मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या सुपूर्द करण्यात आल्याचे महेश तरडे यांनी सांगितले.

Web Title: friend murder his own friend in ulhasnagar