इंधन दरवाढ कायम, मुंबईत नऊ दिवसात 2.61 रुपयांने पेट्रोल महागले

प्रशांत कांबळे
Thursday, 18 February 2021

गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेली नियमित इंधन दरवाढ आजपर्यंतची सर्वात मोठी दरवाढ ठरली आहे.

मुंबई: सातत्याने इंधनाच्या दरात होणारी वाढ आता शंभरीच्या उंबरठ्यावर आली आहे. गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेली नियमित इंधन दरवाढ आजपर्यंतची सर्वात मोठी दरवाढ ठरली आहे. त्यामुळे बुधवारी मुंबई पेट्रोल 96 रुपये तर डिझेलचे 86.98 रुपये होते. मात्र, राज्यात सर्वाधिक महाग इंधनाचे दर परभणीत होते.

आंतराष्ट्रीय बाजारपेठेत स्वस्त झालेल्या क्रुड इंधनावर केंद्र सरकारने अधिभार आणि विविध कर लावून देशभरात इंधन दरवाढ केली आहे. कोरोनाच्या माहामारीमुळे सर्वसामान्य जनता आधीच हैराण आहे. त्यामध्येच अनेकांच्या खासगी नौकऱ्या गेल्या असून, कामगारांच्या हाताला काम नाही. त्यातच सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करताना सुद्धा अनेक नियमांचे बंधन असून, त्यातच खासगी वाहनाने प्रवास केल्यास, पेट्रोलचे भाव शंभरी पार करण्याच्या मार्गावर असल्याने सर्वसामान्यांपुढे सध्या दुहेरी संकट निर्माण झाले आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक

त्यातच दुसरीकडे मालवाहतूकदार सुद्धा हैराण झाले असून इंधन दरवाढीपूर्वी कंपन्यांसोबत केलेले करार मोडू शकत नसून भाडेवाढ सुद्धा करू शकत नसल्याने, वाहतूकदारांचे प्रचंड नुकसान होत असल्याचे मालवाहतूकदार संघंटनांकडून सांगितले आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने इंधनाचे दर कमी करावी अशी मागणी सुद्धा वाहतुकदारांकडून केली जात आहे.
 
परभणीत पुन्हा इंधनाचा भडका

राज्यभरात बुधवारी पेट्रोल डिझेलचे दर परभणीत होते. यामध्ये पेट्रोल 98.25 रुपये तर डिझेल 87.81 रुपये प्रति लिटर विकल्या गेले. त्याचबरोबर सर्वाधिक नांदेड मध्ये पेट्रोल 97.82 तर डिझेल 87.41, रत्नागिरी येते पेट्रोल 97.पेट्रोल, डिझेलचे 29 तर डिझेल 86.87 रुपये, यवतमाळ मद्ये पेट्रोल 97.3 तर डिझेल 86.66 रुपये दर दिवसभर होता.

हेही वाचा- मुंबईकरांची चिंता पुन्हा वाढली, कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पुन्हा वाढला

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Fuel price Petrol Mumbai is at Rs 96 per litre Today


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fuel price Petrol Mumbai is at Rs 96 per litre Today