शिंदे गटाला धक्का! बाळासाहेबांचं नाव घेत मुंबईच्या डब्बेवाल्यांचा ठाकरे गटाला पाठिंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

शिंदे गटाला धक्का! बाळासाहेबांचं नाव घेत मुंबईच्या डब्बेवाल्यांचा ठाकरे गटाला पाठिंबा

मुंबई : आगामी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांना अनेक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. मुंबईतील डब्बावाल्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे यांना विविध स्तरातून पाठिंबा जाहीर होत आहे. (Uddhav Thackeray news in Marathi)

हेही वाचा: भारत जोडो यात्रा 2024 लोकसभा निवडणुकीत 'गेम चेंजर' ठरणार; जयराम रमेश यांचा दावा

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत, आम्ही तुमच्या पाठिशी असल्याचं आश्वासनही मुंबई डब्बेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी उद्धव ठाकरेंना दिले. याआधी बुधवारी, CPIच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची भेट घेत अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे. सीपीआयच्या नेत्यांनी सांगितले की, ते भाजपविरुद्धच्या लढाईत एमव्हीएच्या पाठीशी उभे राहतील. महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांनीही बुधवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

याआधी काँग्रेस नेते नाना पटोले, अमित देशमुख आणि भाई जगताप यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आगामी पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा दिला होता.

हेही वाचा: Shiv Sena: मी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणार; उद्धव ठाकरेंनी घेतली शपथ

एकंदरीतच उद्धव ठाकरे गटाला पोटनिवडणुकीसाठी मोठा पाठिंबा मिळत आहे. तर भाजप आणि एकनाथ शिंदे गटात उमेदवारीवरून खलबतं सुरू आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना डब्बेवाला संघटनेचा मिळालेला पाठिंबा शिंदे गटासाठी धक्का मानला जात आहे.