24 जुलैपर्यंत संपूर्ण रायगड जिल्हा बंद, लोकहो घरातील सामान भरून ठेवा...

सुमित बागुल
Monday, 13 July 2020

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत जातेय. या पार्श्वभूमीवर ठाणे, नवी मुंबई मागोमाग आता रायगड जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय

रायगड : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत जातेय. या पार्श्वभूमीवर ठाणे, नवी मुंबई मागोमाग आता रायगड जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. गेल्या काही दिवसात रायगडमधील कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळाली. गेल्या दहा दिवसात रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या तीन ते साडेतीन हजारांनी वाढलेली पाहायला मिळालीये. याच पाश्वभूमीवर आता रायगड जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन घेण्यात येणार आहे.

रागडमध्ये आज सर्वपक्षीय आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चर्चा झाली. यानंतर संपूर्ण रायगड जिल्ह्यात १० दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. १५ जुलै मध्यरात्रीपासून ते २४ जुलैपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. याआधी रायगड जिल्ह्यातील केवळ पनवेल महापालिका हद्दीत लॉकडाऊन सुरु होता. मात्र आता २४ तारखेपर्यंत घेण्यात येणाऱ्या लॉकडाऊनमुळे पनवेल महापालिकेतील लॉकडाऊन देखील २४ तारखेपर्यंत वाढलाय.     

मोठी बातमी - नवऱ्याच्या गाडीत पाहिलं 'ती'ला आणि बायकोने केली आख्खी मुंबई जॅम...

मिशन बिगिन अंतर्गत राज्यात राज्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्याने मुंबई, मुंबई MMR, पुणे, पिंपरी चिंचवडसह  सगळीकडे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढलेत. याच पार्श्वभूमीवर सर्वात आधी ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईमध्ये १० दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये देखील लॉक डाऊन घेण्यात येतोय. तर ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईमध्ये लॉकडाऊन  आठवडाभरासाठी  लॉकडाऊन वाढवण्यात आला. रायगड जिल्ह्यातील कोविड रुग्णसंख्या पाहता आता संपूर्ण रायगड जिल्ह्यात १० दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन घेण्यात येणार आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची घोषणा केलीये.

एकट्या रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ७ हजार सातशे ६४ रुग्ण आहेत आणि २१२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

full raigad district to remain close total lockdown till 24th july declared by aditi tatkare 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: full raigad district to remain close total lockdown till 24th july declared by aditi tatkare