गुरूदास कामत यांच्यावर अंत्यसंस्कार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईतील चेंबूर येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईतील चेंबूर येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी कामत यांच्या निवासस्थानी त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी कामत यांचे अंत्यदर्शन घेतले.

Web Title: Funeral on Gurudas Kamat