'माझ्या अमूल ताकत बुरशी', टिटवाळ्याच्या ग्राहकाची तक्रार...

'माझ्या अमूल ताकत बुरशी', टिटवाळ्याच्या ग्राहकाची तक्रार...

मुंबई - उन्हाळा जवळ येतोय. वातावरणात उष्मा वाढतोय अशात अनेकांकडून शीतपेयांऐवजी ताक, उसाचा रस किंवा सीलपॅक चांगल्या दर्जाचे फळांचे ज्युसेस घेणं पसंत केलं जातंय. अशात मुंबईनजीकच्या टिटवाळ्यातून 'अमूल' या कंपनीच्या सीलपॅक ताकात बुरशीसारखा पदार्थ निघाल्याचा आरोप एका ग्राहकाकडून करण्यात येतोय. सदर प्रकार हा 'K2' रेल्वे प्रवासी संघटनेचे सदस्य प्रफुल्ल शेवाळे यांच्या बाबतीत घडलाय. एका ग्राहकाने हा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.   

शेवाळे यांनी टिटवाळ्यातील 'पटेल मार्ट'मधून अमूल कंपनीचं ताक विकत घेतलं. या ताकाला पिण्याआधी त्यांनी आपल्या फिजमध्ये ठेवलं. त्याचा बर्फ झाल्यानंतर हे पाकीट पिण्यासाठी फोडलं असता या पाकिटाच्या आतल्या बाजूला बुरशीजन्य पदार्थ आढल्याचं शेवाळे यांनी म्हटलंय. 

अमूल कंपनीकडून आपल्या उत्पादनाच्या बाबतीत कायम काळजी घेतली जाते. अमूलची उत्पादनं ग्राहकांपर्यंत पोहोण्यापूर्वी आणि त्याचा वापर होण्यापर्यंत योग्य ती काळजी घेतली जाते. अशात अमूलसारख्या कंपनीच्या ताकातून बुरशीजन्य पदार्थ आढळल्याने शेवाळे यांना धक्का बसलाय. दरम्यान, प्रफुल्ल शेवाळे यांनी अन्न आणि औषध प्रशासन याचसोबत अमूल कंपनीला देखील याबाबत तक्रार केली आहे. अमूल कंपनीकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. अमूल कंपनीकडून प्रतिक्रिया आल्यानंतर याबाबतीत आणखीन माहिती देता येईल. 

fungus in amul chas buyer from titwala files complains to food and drugs department

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com