चंद्रकांत पाटील यांच्या 'पीएचडी'वर; शरद पवारांचं जबरदस्त उत्तर 

टीम ई-सकाळ
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने रविवारी मुंबईत भारतीय क्रीडा मंदिर येथे  ‘संवाद साहेबांशी’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला शरद पवारांवर पीएचडी करायची आहे, असं वक्तव्य नुकतचं केलं होतं. त्यावर आता खुद्द शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. आपल्या मिश्कील शैलीत त्यांनी चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावलाय. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी हे उत्तर दिलं. त्याला उपस्थित विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त दाद दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय म्हणाले शरद पवार?
मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने रविवारी मुंबईत भारतीय क्रीडा मंदिर येथे  ‘संवाद साहेबांशी’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी शरद पवार यांनी खास शैलीत विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर पीएचडी करेन, असे विधान केले होते. हाच प्रश्‍न सोमय्या महाविद्यालयातील एका तरुणीने पवार यांना विचारला. तेव्हा पवार साधारण पीएचडी करण्यास दोन-तीन वर्षे लागतात. पण, माझ्यावर पीएचडी करण्यास चंद्रकांत पाटील यांना दहा ते बारा वर्षे लागतील, असे बोलताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. 

आणखी वाचा - कॉलेजमधल्या निवडणुकांबाबत शरद पवार काय म्हणाले?

आणखी वाचा - माझं वय  80 असलं तरी...: शरद पवार 

'वयाचा परिणाम नाही'
शरद पवार सध्या 80 वर्षांचे आहेत. या वयातही त्यांचा उत्साह इतरांना लाजवेल असा असतो. त्याांच्या वयाचा मुद्दा सातत्यानं उपस्थित केला जातो. या कार्यक्रमातही हा मुद्दा चर्चेला आला. त्यावर पवार म्हणाले, 'तरुण आणि माझ्या पिढीतील अंतर मला जाणून घ्यायचे आहे. यासाठी मी इथे आलो आहे. माझे वय ८० असले, तरी त्याचा सामाजिक प्रश्‍न जाणून घेण्यावर कोणताही परिणाम झालेला नाही.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar replied chandrakant patil about phd statement