
ZP School
ESakal
पालघर : पालघर जिल्हा परिषदेमध्ये २०१७ पासून मराठी माध्यमाच्या शिक्षकपदांची रिक्त पदे आहेत. त्यामुळे जिल्ह्याबाहेर बदली करून जाणारे शिक्षकांसह विकल्पाने बदली घेणाऱ्या शिक्षकांना सोडू नये, असा ठराव जिल्हा परिषदेने घेतला होता; मात्र जिल्हा परिषदेने ४०४ आंतरजिल्हा तर २२१ शिक्षकांना विकल्पने सोडल्यामुळे अठरा टक्के रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागणार आहे.