परीक्षा दिल्यानंतरही शून्य गुण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

वांद्रे येथील जी. जे. अडवाणी विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीला पाचव्या सत्राच्या परीक्षेत पूर्ण प्रश्‍नपत्रिका सोडवूनही शून्य गुण मिळाले.

मुंबई - वांद्रे येथील जी. जे. अडवाणी विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीला पाचव्या सत्राच्या परीक्षेत पूर्ण प्रश्‍नपत्रिका सोडवूनही शून्य गुण मिळाले. या संदर्भात विचारणा केली असता परीक्षा विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली, असे तिने सांगितले.

अडवाणी विधी महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकणाऱ्या काजल पाटील या विद्यार्थिनीने जानेवारीत झालेल्या पाचव्या सत्राच्या परीक्षेत ‘पब्लिक इंटरनॅशनल लॉ’ विषयाचा पेपर पूर्णत: लिहिला. परंतु, निकालामध्ये तिला शून्य गुण मिळाले. तिने हे परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले. अधिकाऱ्यांनी तिला परीक्षेला उपस्थित असल्याचे हजेरीपत्रक महाविद्यालयाकडून सादर करण्यास सांगितले. असा प्रकार अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत झाला आहे; त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज आल्यावर एकत्रित तोडगा काढण्यात येईल, असे तिला सांगण्यात आले.

Web Title: G. J. Advani Law College student test after the zero mark