दादर-माहिममध्ये कोरोना नियंत्रणात, धारावीतील परिस्थिती 'जैसे थे'

मिलिंद तांबे
Tuesday, 20 October 2020

मुंबईतल्या जी उत्तर विभागातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.  जी उत्तरमध्ये सोमवारी 49 नविन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. तर ऍक्टीव्ह रूग्णांचा आकडा ही कमी झाला आहे. हा आकडा 857 पर्यंत कमी झाला आहे. 

मुंबई: कोरोनानं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढताना दिसतोय. त्यात मुंबईतही कोरोनाचं संकट अद्याप कमी होताना दिसत नाही आहे. पालिका प्रशासनाकडून कोरोनाला रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता मुंबईतल्या जी उत्तर विभागातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.  जी उत्तरमध्ये सोमवारी 49 नविन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. तर ऍक्टीव्ह रूग्णांचा आकडा ही कमी झाला आहे. हा आकडा 857 पर्यंत कमी झाला आहे.  

धारावीमध्ये सोमवारी दिवसभरात 14 नवीन रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 3431 इतकी झाली आहे. तर 145 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अधिक वाचाः  महिलांना लोकल प्रवास देण्यासाठी रेल्वे तयार, लवकरच निर्णय होण्याची शक्यता

दादरमध्ये काल 13 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 4,168 इतकी झाली आहे. तर 316 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्ये काल 22 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 3,820 इतकी झाली आहे. तर 396 एॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

अधिक वाचाः  KEM रुग्णालयात प्लॅटिना ट्रायलला सुरुवात होणार, जाणून घ्या काय आहे प्लॅटिना ट्रायल

धारावी, दादर, माहिम परिसराचा समावेश असणाऱ्या जी उत्तर विभागात सोमवारी 49 नवीन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 11,419 वर पोहोचला आहे.  आतापर्यंत 584 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये 2,979, दादरमध्ये 3,693 तर माहीममध्ये 3,289 असे एकूण 9,961 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.   857 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

-----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

G North added 49 new corona patients Monday number active patients decreased


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: G North added 49 new corona patients Monday number active patients decreased