वरळी कोळीवाड्यातून आली एक आनंदाची बातमी, म्हणूनच वरळीकर घेताहेत आता मोकळा श्वास

वरळी कोळीवाड्यातून आली एक आनंदाची बातमी, म्हणूनच वरळीकर घेताहेत आता मोकळा श्वास

मुंबईः  कोरोनानं मुंबई शहराला विळखा घातला. शहरात वरळी आणि धारावी कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले. मात्र कठोर शिस्त आणि आक्रमक चाचणीमुळे वरळी भाग आता कोरोनामुक्त होत चालला आहे. वरळी हा भाग मुंबईतल्या G South या वॉर्डमध्ये येतो. या वॉर्डमध्ये वरळी, लोअर परेल आणि प्रभादेवी असे क्षेत्र येतात. या वॉर्डमध्ये एकूण ४,३३१ प्रकरणांची नोंद झाली आहे, आता फक्त ४७० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या आठवड्यात प्रभागात केवळ ६३ नवीन रुग्ण आढळून आले. येथील कोविड-१९ चा विकास दर फक्त ०.९  टक्के आहे, तर डबलिंग रेट ७९ दिवस आहे. शहराचा विकास दर 1.14 टक्के आहे आणि डबलिंग रेट ६१ दिवस आहे.

मुंबई शहरातील वरळी कोळीवाडा एप्रिलमध्ये कंन्टेन्मेंट झोनमध्ये रूपांतरित करणारे शहरातील पहिले क्षेत्र होते. आता २३५ या आकडेवारीतून केवळ १३ सक्रिय प्रकरणे आहेत. मासेमारी कॉलनीत एकूण 202 रुग्ण बरे झालेत.
 
प्रभागचे सहाय्यक नगरपालिका आयुक्त शरद उघाडे म्हणाले की, जिजामाता नगर, आदर्श नगर आणि जनता कॉलनी यासारख्या हॉटस्पॉट्समध्येही रुग्णांच्या संख्येत घट दिसून आली आहे. या हॉटस्पॉट्सवर, आमच्याकडे एकूण ५६२ पैकी केवळ 22 सक्रिय प्रकरणे आहेत. ५१० हून पेक्षा जास्त रुग्ण बरे झालेत.  येथे कोरोना नियंत्रणात येऊ लागला आहे.  उघाडे यांनी निदर्शनास आणून दिले की प्रभागाच्या यशाचा पुरावा त्याच्या आरोग्य सुविधांमध्ये असलेले रिक्त बेड्स आहेत. वरळीतील एनएससीआय येथील केंद्रांवर इतर प्रभागातील लोकांवर उपचार केले जातात.

प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीतून 90 टक्के परिसर वगळण्यात आला आहे. आता केवळ 17 ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रात असून लवकरच ही ठिकाणेही प्रतिबंधमुक्त होतील, असा आशावाद जी-दक्षिण विभागातील सहाय्यक आयुक्त शरद उघाडे यांनी व्यक्त केला.

कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला महापालिकेच्या जी दक्षिण विभागातील वरळी कोळीवाडा ओळखला जायचा. वरळी कोळीवाडा भागातील अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊन 13 वर आल्याने प्रशासनासह रहिवाशांनाही दिलासा मिळाला आहे. वरळी कोळीवाडा हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ आहे. येथील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं अथक प्रयत्न केले. 

वरळीचे आमदार असलेले राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, प्रभागात घेतलेल्या चाचण्या, ट्रेसिंग आणि विलगीकरणाचे मॉडेल इतरांसाठी टेम्प्लेट म्हणून काम करू शकते. आपण अजूनही जागृत राहिलेच पाहिजे… जी-दक्षिणसाठी काय काम केले ते म्हणजे नागरिकांचे सहकार्य आणि डॉक्टर, महानगरपालिका कर्मचारी आणि पोलिसांची मेहनतीमुळे हे दिवस आले असल्याचंही ते म्हणालेत.

G South Worli Koliwada recovered containment zone

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com