गडकरी अन् राज ठाकरेंची पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्तभेट अन्.. २०१४ मध्ये का नाही झाली मनसे-भाजप युती?

राज ठाकरे देशात पहील्यांदा म्हणाले होते. त्यानंतर मोदी आणि ठाकरेंची किंबहुना भाजपची जवळीक चांगलीच वाढली होती | Modi and Thackeray's closeness to BJP had increased
BJP-MNS Alliance
BJP-MNS AllianceEsakal

Loksabha Election 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती आता जवळपास नक्की समजली जात आहे. आजच शिंदे-फडणवीस आणि राज ठाकरे यांची बैठक झाली.(2014 loksabha election)

तर काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक निवडणुकांमध्ये ही युती दोन्ही पक्षांसाठी फायद्याची असल्याचेच चित्र आहे. (Nitin gadkari meets raj thackeray 2014 )

BJP-MNS Alliance
Nagpur Loksabha: पहिल्याच दिवशी नागपूरसाठी एक उमेदवारी अर्ज दाखल, रामटेकसाठी इतक्या उमेदवारांनी घेतले अर्ज

मात्र २०१४ लाच राज ठाकरे आणि भाजपची युती नक्की झाली होती पण उद्धव ठाकरेंमुळे ती बिनसली हे तुम्हाला माहीत आहे का? (mns bjp yuti)

हा राजकीय किस्सा आहे साल २०१४चा. जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते नरेंद्र मोदी. त्यावेळी राज ठाकरेंनी गुजरात दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी मोदींचे तौंडभरुन कौतुक केलं. त्यावेळी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाच्या क्षमतेचे नेते आहेत. असे राज ठाकरे देशात पहील्यांदा म्हणाले होते. त्यानंतर मोदी आणि ठाकरेंची किंबहुना भाजपची जवळीक चांगलीच वाढली होती. (raj thakeray with bjp)

BJP-MNS Alliance
Loksabha Election : 75 हजार मतदारांनी केलं 'EVM'द्वारे मतदान; जिल्ह्यात 20 मोबाईल व्हॅनद्वारे प्रात्यक्षिक

त्यावेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच मार्च महिन्यात भाजपचे माजी पक्षाध्यक्ष आणि आताचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची आणि राज ठाकरे यांची मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाली होती. मनसेने युतीविरोधात उमेदवार उभे करू नयेत अशी विनंती ठाकरेंना गडकरींनी केली होती. (maharashtra news )

भाजपने राज यांना आकर्षक पर्याय दिला होता. मनसेने उमेदवार उभे न करण्याच्या बदल्यात मनसेला राज्यसभेच्या दोन जागा आणि आगामी विधानसभा निवडणुकीत तीस ठिकाणी उमेदवारी दिली जाणार होती. मात्र त्यावेळी अखंड शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेले आणि राज ठाकरेंचे मोठे बंधु उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाला विरोध केला होते (raj thackeray modi)

(हा किस्सा तुम्ही वरिष्ठ पत्रकार आणि लेखक धवल कुलकर्णी यांच्या ठाकरे विरुद्ध ठाकरे या पुस्तकात वाचू शकता)

BJP-MNS Alliance
Sangli Loksabha : संजय पाटलांच्या उमेदवारीवरुन माजी आमदाराची तीव्र नाराजी; भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com