महावितरण कार्यालयात जुगाराचा डाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

उल्हासनगरातील कॅम्प ४ मधील लालचक्की-व्हीनस चौकातून कॅम्प ५, गांधी रोड येथे स्थलांतरित केलेल्या महावितरण कार्यालयात पत्ते खेळणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

उल्हासनगर : उल्हासनगरातील कॅम्प ४ मधील लालचक्की-व्हीनस चौकातून कॅम्प ५, गांधी रोड येथे स्थलांतरित केलेल्या महावितरण कार्यालयात पत्ते खेळणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

एका अधिकाऱ्याने या जुगाराच्या डावाचे चित्रीकरण करून ते दाखवल्यावर अंबरनाथ विभागीय कार्यकारी अभियंता अशोक सावंत यांनी आठपैकी सात कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून, एका कंत्राटी कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकले आहे. ३० नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजल्यानंतर अधिकारी वर्गाची सुट्टी झाल्यावर वरिष्ठ तंत्रज्ञ टिकेकारा ओसेफ फ्रान्सिस, तंत्रज्ञ निखिल पवार व महेश काळसईतकर, विद्युत सहायक इलमोद्दीन शेख, संतोष भोसले, मंगेश वानतकर, कनिष्ठ कार्यालयीन सहायक विनोद बोबले तसेच कंत्राटी कामगार सुनील पांचाळ यांनी कार्यालयातच पत्त्यांचा डाव सुरू केला.

एका अधिकाऱ्याने तिथे जाऊन मोठ्या चलाखीने डावाचे चित्रीकरण करून ते कार्यकारी अभियंता अशोक सावंत यांना मोबाईलवर पाठवले.

web title : Gambling at mahavitarans Office


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gambling at mahavitarans Office