गणेश मंडळांना सवलतीचा वीजदर 

गणेश मंडळांना सवलतीचा वीजदर 

मुंबई - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सवलतीच्या वहन आकारासह 4 रुपये 38 पैसे प्रतियुनिट या माफक वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी, तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे. तात्पुरत्या वीजजोडणीच्या बिलिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वीजमीटरसाठी घेतलेल्या रकमेतील उर्वरित रक्कम गणेश मंडळांना परत करण्याचे निर्देशही क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आले आहेत. 

गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्‍यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते. त्यातून जीवघेणे अपघात घडतात. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. 

सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व 
सर्व धर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांकरिता तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट 3 रुपये 20 पैसे आणि 1 रुपया 18 पैसे वहन (व्हिलिंग) आकार, असे 4 रुपये 38 पैसे प्रतियुनिट वीजदर आहेत. व्हिलिंग चार्जेससह हा दर घरगुती वीजदरापेक्षा फक्त 13 पैशांनी अधिक आहे, तर वाणिज्यिक दरापेक्षा 2 रुपये 90 पैसे प्रतियुनिटने कमी आहे. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीजजोडणीचा वीजदर कमी ठेवण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com