ठाणे : ‘माझ्या गरजांइतके पैसे माझ्याकडे आहेत. मी अशी कोणतीही कामे करीत नाही, ज्यामुळे आयकर किंवा सीबीआयचा छापा पडेल. त्यामुळे माझा व्हिडिओ व्हायरल करायचा असेल तर आताच करा, असे थेट आवाहन वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले. दोन दिवसांपूर्वी शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी नाईक यांच्या ‘नालायकपणाचे व्हिडिओ’ संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटागृहांत प्रदर्शित करू, असा इशारा दिला होता. त्यावर गणेश नाईक यांनी देखील हे आवाहन दिले.