

navi mumbai municipal corporation
ESakal
वाशी : नवी मुंबई महानगरपालिकेतील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून गणेश नाईक यांचे पालिकेवरील वर्चस्व अधिक ठळकपणे समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या घडामोडींमुळे भाजपातील अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषतः आमदार मंदा म्हात्रे यांचे समर्थक पुन्हा एकदा डावलले गेल्याने राजकीय वातावरण तापले आहे.