
Boisar Railway Subway Project
ESakal
बोईसर : बोईसर रेल्वेस्थानकाजवळ उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग उभारणीचे काम समन्वयाने जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. तसेच भुयारी मार्गासाठी आवश्यक निधी मिळविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य शासनास प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.