कुंदे येथे जातीय सलोखा व शांततेचे गणेशपुरी पोलिसांचे आवाहन

दीपक हीरे
रविवार, 25 मार्च 2018

मराठी शाळेत जातीय सलोखा व शांतता व कायदा व सुव्यवस्था अबधित रहावा यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी गावात राजकरण न करता तरुनानी कुठलाही जाती भेद व अफवा पसरु नये व एकत्रित राहून गुण्यागोविंदाने कुठलाही वाद न करता आदर्श गाव बनवा, असे मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील गनेशपुरी पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या कुंदे या गावात एका दलित कुटुंबियावर झालेल्या अन्याय बाबत खुप वाद चिघळला होता. याबाबत परिसरात जातीय सलोखा व शांतता राहावी म्हणून गनेशपुरी पोलिस ठाणे मार्फत कुंदे या गावी सर्व प्रशासकीय अधिकारी मिळून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कुंदे या गावी राजेन्द्र थूले या दलित समाजातील तरुणावर जामिनीच्या वादातून येथील काही मंडळींनी मारहाण करुन मोठा वाद निर्माण केला होता. याबाबत सामने वाला यांच्यावर एटरासिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले होते. मात्र असे असतना देखील या गेले पंधरा दिवसांपासून अंतर्गत धुसफुस चालू होती. यामुळे परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त होता अखेर गनेशपुरी पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक शेखर डोभे व श्रमजीवी संघटनेचे बाळराम भोईर यांनी परिसरात शांतता राहावी, यासाठी परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री काटकर भिवंडीचे तहसीलदार शशिकांत गायकवाड, आर पी आयचे किरण चन्ने, भाजपाचे दयानंद चोरघे तसेच गनेशपुरी पोलिस ठाणे शांतता कमिटीचे दीपक हीरे, पोलिस पाटील, गाव कमिटी, तंटामुक्त आदी सर्व स्तरावरील मान्यवर एकत्र येऊन कुंदे या गावी मराठी शाळेत जातीय सलोखा व शांतता व कायदा व सुव्यवस्था अबधित रहावा यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी गावात राजकरण न करता तरुनानी कुठलाही जाती भेद व अफवा पसरु नये व एकत्रित राहून गुण्यागोविंदाने कुठलाही वाद न करता आदर्श गाव बनवा, असे मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व त्यास येथील ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन गावात शांतता राखु, असे आश्वासन दिले. या कार्यशाळेत मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होते.

Web Title: Ganesh Puri police appealed for communal harmony and peace at Kunde