Ganesh Visarjan 2022 : विसर्जन मिरवणूकीत मनसे नेत्यांकडून हनुमान चालीसा पठण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Mankhurd Ganesh Visarjan 2022

Ganesh Visarjan 2022 : विसर्जन मिरवणूकीत मनसे नेत्यांकडून हनुमान चालीसा पठण

मानखुर्द : गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया च्या गजरात मानखुर्दच्या राजाचे जल्लोषात मध्यरात्री आगमन झाले. हनुमान चालीसा पठण करत बाप्पाचे मानखुर्द मोहिते पाटील नगरीत गणेश भक्तांकडून भव्य स्वागत करण्यात आले. नगरातील महिलांनी श्रीफळ फोडून मिरवणूकीला सुरुवात केली. उत्सवात लहान मोठे महिला पुरुष सर्वांचा सहभाग होता.

सालाबाद प्रमाणे याही वर्षी मानखुर्दच्या राजाचे थाटात विसर्जन मिरवणूक पार पडली. कोरोना काळात दोन वर्ष गणपती उत्सव साजरा होऊ शकला नाही, या वर्षी मात्र सगळी कडे खूप मोठ्या उत्सवात गणेशोत्सव पार पडला. डीजे साऊंड सिस्टिमला परवानगी मिळाल्या तसेच ढोल ताशा पथक यांचा जल्लोष पाहायला मिळाला.

दरवर्षी प्रमाणे मानखुर्द मोहिते पाटील नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून नवनवीन उपक्रम राबविण्यात येत असतात. गणपती समोरील देखावे हे आकर्षित असतात. तसेच मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी राजकीय नेते देखील हजेरी लावतात.

मोहिते पाटील नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुधीर नवले हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित मराठी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मानखुर्द, शिवाजीनगर विधानसभा उपविभाग सचिव आहेत. मंडळाच्या मिरवणूकीत डीजे वर हनुमान हनुमान चालीसा पठण झाले. तेथील तरुणांचा जल्लोष हा चर्चेचा विषय बनला आहे. वाजत गाजत मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले.

Web Title: Ganesh Visarjan 2022 Mumbai Mankhurd Ganesh Idol Procession Hanuman Chalisa Mns

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..