
राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गुरुवारी अनेक ठिकाणी दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जनही करण्यात आलं. दरम्यान, मुंबईत लहान गणेशमुर्ती समुद्रात सोडण्यास मनाई असल्यानं त्या महापालिकेकडे सोपवण्यात आल्या होत्या. महापालिकेकडून या मूर्ती विसर्जित करण्यात येणार असल्याचं भाविकांना सांगण्यात आलं. मात्र आता या मूर्ती कल्याणमधील एका डंपिंग ग्राउंडवर कचऱ्याच्या ढिगात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे समजताच स्थानिकांनी बीएमसीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आणि दीडशेपेक्षा जास्त डंपर मूर्त्यांसह तसेच परत न्यायला भाग पाडलं.