
कांदिवली : फार वर्षांपूर्वी बोरिवली पश्चिमेला ‘वझिरा गावठण’ हा खडकाळ भाग होता. येथे खडकावर गणेशाची मूर्ती उमटली, अशी भाविकांची धारणा आहे. ठेकेदार सुरुंग लावून खडक फोडून बांधकामासाठी खडी पुरवत असे. एके दिवशी एक कामगार एका मोठ्या दगडाला सुरुंग लावण्याचे काम करीत होता. दुपारचे भोजन घेऊन थोड्या विश्रांतीसाठी पहुडला, तेव्हा झोपेतच श्रींनी त्याला दृष्टांत दिला. ‘हा खडक तू फोडू नकोस, माझी स्थापना येथे होणार आहे,’ असे त्याला सांगण्यात आले, अशी आख्यायिका परिसरातील नागरिकांकडून ऐकायला मिळते.